पुणे दिनांक २१ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पुण्यातील कल्याणीनगर येथील भागात हिट अँड रन प्रकरणी व दोघांना पोर्शे कारने चिरडणा-या प्रकरणी फरार बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 👮 संभाजीनगर येथून आज पहाटे मुसक्या आवळल्या असून त्याला पुणे पोलिस घेऊन पुण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत.
पुणे पोलिसांनी विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.त्यानंतर ते फरार झाले होते.पुणे पोलिसांनी त्यांच्या अटकेसाठी पथके नेमण्यात आली होती.आज मंगळवारी पहाटे संभाजीनगर मधून विशाल अग्रवाल यांना ताब्यात घेतले आहे.आज दुपार पर्यंत त्यांना पुण्यात आणण्यात येणार आहे.विशाल अग्रवाल यांचा मुलगा वेदांत अग्रवाल हा अल्पवयीन असतांना देखील दारु ढोसून पोर्शे कार भरघाव वेगाने चालवून कल्याणीनगर येथे बाईक स्वाराला चिरडल्याने यात दोन जणांचा मृत्यू झाला होता.त्यानंतर पुण्यात प्रचंड प्रमाणावर अनेक नागरिकांनी संताप व्यक्त केला.मुलगा अल्पवयीन असून देखील त्याला जाणून बुजून कार चालविण्यासाठी दिली म्हणून विशाल अग्रवाल यांच्या विरोधात मोटर वाहन अधिनियम कलम ३.५ व १९९ कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.तसेच आपला मुलगा अल्पवयीन मुलगा दारु ढोसतो हे माहीत असून देखील त्याला पार्टी करण्यासाठी परवानगी दिली.या बद्दल विशाल अग्रवाल यांच्या बाल न्याय अधिनियमाच्या कलम ७५ व ७७ अंतर्गत आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यामुळे त्यांना अटक केल्याने बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.