पुणे दिनांक २२ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील कल्याणीनगर परिसरात पोर्शे कार भरघाव वेगाने चालवून दोघां आयटी इंजिनियर यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने आज बुधवारी पुण्यातील बाल हक्क मंडळात हजार करण्यात आलं.त्याची आता बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे दरम्यान पोलिस तपासानंतर तो सज्ञान की अज्ञान आहे ते ठरवलं जाणार आहे.तोप्रर्यत त्याला बाल सुधारगृहात ठेवण्यात येणार आहे.आता या प्रकरणाचा संपूर्ण तपास करण्यात येणार आहे.
दरम्यान या अपघाताबाबत संपूर्ण तपास पूर्ण होवू पर्यंत त्याची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.याबाबतचा संपूर्ण तपास झाल्यानंतरच तो सज्ञान आहे की अज्ञान ते ठरविले जाणार आहे.तो प्रयत्न त्याला १४ दिवसांसाठी बालसुधारगृहात ठेवण्यात येणार आहे.दारु ढोसून नशेमध्ये भरघाव वेगाने पोर्शे कार चालवून या अल्पवयीन आरोपींनी दोघां आयटी इंजिनियर यांचा जीव घेतला.त्यानंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आला होता.आज बाल न्याय मंडळाने त्याचा जामीन रद्द करत अल्पवयीन आरोपी सज्ञान आहे की नाही हे पोलिस ठरवतील असं बाल न्याय मंडळाने म्हटलं आहे.पोलिसांनी आज त्याच्यावर पुन्हा नव्याने नवीन कलम लावलं व त्याचा जामीन रद्द करावा अशी मागणी आज केली होती.त्यानंतर आता बाल न्याय मंडळाने त्याचा जामीन रद्द करून त्याची रवानगी बाल सुधारगृहात केली आहे.