Home क्राईम अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा नदीत SDRF पथकाची ⛵ बोट बुडून तीन जवानांचा मृत्यू...

    अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा नदीत SDRF पथकाची ⛵ बोट बुडून तीन जवानांचा मृत्यू तर दोघांचा शोध सुरू

    450
    0

    पुणे दिनांक २३ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातून मोठी अपडेट आताच हाती आली असून येथील प्रवरा नदीमध्ये एसडीआर‌एफच्या जवानांची ⛵ बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत पाच जवान बुडाले असून यात तीन जवानांचा मृत्यू झाला आहे.तर अन्य दोन जवानांचा शोध स्थानिक नागरिकांच्या मदतीने घेतला जात आहे.

    दरम्यान या घटने बाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार काल बुधवारी प्रवरा नदीत दोन युवक बुडाले होते.यासाठी एसडीआर‌एफची टीम येथे बचावकार्या साठी आली होती.त्यांनी तातडीने या नदीत बचाव कार्य हाती घेतले व बुडालेल्या दोन युवकापैकी एकाचा मृतदेह सापडला तर दुस-या युवकाचा शोध घेत असतानाच एसडीआर‌एफची बोट नदीत उलटून शोध घेणा-या जवानांचा बोट नदीच्या पात्रात बुडाली या दुर्घटनेत पाच जवान बुडाले यात तिंघाचा मृत्यू झाला आहे तर अन्य दोन जवानांचा शोध आता सुरू आहे.ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सुगावा जवळ जवळ घडली आहे.दरम्यान या दुर्घटने बाबत माहिती मिळताच प्रांताधिकारी शैलेश कुमार हिंगे व काॅग्रेस पक्षाचे माजी महसूल मंत्री व आमदार बाळासाहेब थोरात हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत.

    Previous articleसोलापूर येथील उजनी धरणात बुडालेल्या पाच जणांचे मृतदेह सापडले.पोलिसांकडून ओळख पटवण्याचे काम सुरू
    Next articleगुंड शरद मोहोळच्या खून प्रकरणी एकूण १६ आरोपींच्या विरोधात दोन हजार पानांचे आरोपपत्र कोर्टात दाखल

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here