Home क्राईम डोंबिवलीतील स्फोटातील मृतांचा आकडा ११ वर .’स्फोटाला शिंदे सरकार जबाबदार ‘अंबादास दानवे

    डोंबिवलीतील स्फोटातील मृतांचा आकडा ११ वर .’स्फोटाला शिंदे सरकार जबाबदार ‘अंबादास दानवे

    151
    0

    पुणे दिनांक २४ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) डोंबिवलील एमआयडीसी मधील कंपनीत बाॅयलरचा झालेल्या भीषण स्फोटात मोठी दुर्घटना झाली होती.या घटनास्थळी आज विरोधीपक्षनेते अंबादास दानवे हे दाखल झाले आहेत.यावेळी त्यांनी घटनास्थळाची पाहाणी केली.व संपूर्ण माहिती घेतली या ठिकाणी सकाळपासून एनडीआर‌एफची टीम  कामगारांची शोधमोहीम राबवत आहे.या शोधमोहीम मध्ये आणखी तीन मृतदेह सापडले आहेत.त्यामुळे आता मृतांचा आकडा वाढून ११ झाला आहे.अजून काही कामगार हे ढिगा-या खाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

    दरम्यान यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की  डोंबिवली एमआयडीसी येथील कंपनीत जो बाॅयलरचा स्फोटाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच जबाबदार आहे असा आरोप यावेळी विरधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालावधीत येथील पाच कंपन्या हालविण्यांचा निर्णय झाला होता.परंतू शिंदे सरकारने पुढे काहीच पाऊले उचलली नाहीत.असे देखील दानवे यावेळी म्हणाले. दरम्यान या दुर्घटनेत आतापर्यंत ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.तर अन्य कामगार हे रुग्णालयात उपचार घेत आहेत.अद्याप या ठिकाणी शोधमोहीम सुरू आहे.

    Previous articleडोंबिवली एमआयडीसी स्फोट प्रकरणी कंपनीच्या मालकाविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
    Next articleअभिनेत्री लैला खान खून प्रकरणी सावत्र बापाला फाशीची शिक्षा

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here