पुणे दिनांक २४ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) डोंबिवली येथील एमआयडीसी फेज दोन मधील एका केमिकल कंपनीत गुरुवारी दुपारी बाॅयलरचा स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडलीय आहे.या भयानक स्फोटाचा आवाज तीन किलोमीटर अंतरावर पोहोचला होता.व कंपनीच्या आजुबाजुच्या घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या होत्या या स्फोटात एकूण आठ कामगार यांचा या दूर्घटनेत मृत्यू झाला तर तीस पेक्षा जास्त कामगार हे जखमी आहेत.सदरची 🔥 आग अग्निशमन दलाच्या जवानांनी आटोक्यात आणली आहे.
दरम्यान डोंबिवली येथील एमआयडीसीतील केमिकल कंपनी अमूदान कंपनीतील बाॅयलरचा स्फोट प्रकरणी कंपनीच्या मालकाविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मालती मेहता व मलय मेहता यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारच्या वतीने पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.