पुणे दिनांक २५ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार कल्याणी नगर येथील अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांच्या पुणे पोलिसांनी 👮 मुसक्या आवळल्या आहेत.चालकाला डांबून ठेवल्या प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे.त्यामुळे आता अग्रवाल कुटुंबांचे पाय चांगलेच खोलात जात असल्याचे एकंदरीत चित्र निर्माण झाले आहे.
दरम्यान याप्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार या अपघातात ड्रायव्हरने पोर्शे कार चालवली असे पोलिसांना जबाब द्यावा यासाठी ड्रायव्हरवर दबाव टाकण्यात आला.या कारणावरुन आज शनिवारी दिनांक २५ मे रोजी अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे.तसेच त्यांनी ड्रायव्हरला धमकावले तसेच त्याला डांबून ठेवण्यात आले असा त्यांच्यावर आरोप आहे.