पुणे दिनांक २७ मे ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीच्या फोन आल्याचे वृत्त समोर येत आहे.एका अज्ञात व्यक्तीने मुंबई पोलिसांना फोन करून ताज हॉटेल व मुंबई विमानतळासह अन्य ठिकाणी बाॅम्ब ठेवल्याची धमकी दिली आहे.त्यानंतर आता मुंबई पोलिस सतर्क झाली आहे.दरम्यान या धमकी प्रकरणी पोलिसांनी फोन लोकेशन तपासले असता हा धमकीचा फोन उत्तर प्रदेश येथून आला असल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे.याप्रकरणी मुंबई पोलिस अधिक तपास करत आहेत.