पुणे दिनांक २९ मे ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मंगळवारी दिनांक २८ मे रोजी पाच वाजण्याच्या सुमारास पश्चिम रेल्वेच्या पालघर स्टेशनजवळ गुजरात वरुन मुंबईकडे जाणाऱ्या मालगाडीचे ५ ते ६ डब्बे रेल्वे रुळावरून घसरुन रेल्वे ट्रॅक नंबर २ ते ३ तसेच ४ हे रेल्वे ट्रॅक मोठ्या प्रमाणावर नादुरुस्त झाल्याने अप व डाऊन ही दोन्ही रेल्वे ट्रॅकवरील रेल्वे सेवा मोठ्या प्रमाणावर रेल्वे सेवा प्रभावित झाली आहे.तर विरार ते चर्चगेट ही लोकलसेवा सुरळीतपणे सुरू आहे.तर विरार ते डहाणू ही उपनगरीय सेवा बंद आहे.अप व डाऊन ही उपनगरीय रेल्वे सेवा मागील २० तासांहून अधिक काळ बंद आहे.तर काही रेल्वे ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.
दरम्यान आता पालघर येथे झालेल्या मालगाडी अपघाताची रेल्वेच्या उच्चस्तरीय चौकशी रेल्वेच्या अधिकाऱ्यांमार्फत केली जाणार आहे.अशी माहिती पश्चिम रेल्वेचे डिव्हीजनल मॅनेजर नीरज वर्मा यांनी दिली आहे.तसेच या चौकशी साठी पाच जणांचे या उच्चस्तरीय समितीत समावेश आहे.दरम्यान या मार्गावरील रेल्वे सेवा ही सायंकाळी पाच वाजेपर्यंत वाहतूक व्यवस्था पूर्ववत होईल असा त्यांनी यावेळी विश्र्वास व्यक्त केला आहे.दरम्यान पहाटे पासून डहाणू ते विरार अशी लोकलसेवा ठप्प आहे.त्यामुळे या भागातून नोकरी व धंद्यानिम्मित मुंबईकडे जाणाऱ्या व येणाऱ्या कामगार यांचे प्रचंड प्रमाणावर हाल होत आहेत.