Home फायर धारावीत आज पहाटे गारमेंटच्या कारखान्याला आग लागून सहा कामगार जखमी

धारावीत आज पहाटे गारमेंटच्या कारखान्याला आग लागून सहा कामगार जखमी

197
0

पुणे दिनांक २९ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबई येथील धारावीत एका गारमेंटच्या कारखान्याला आज बुधवारी पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास भीषण आग 🔥 लागल्याची घटना घडली आहे.या ठिकाणी सर्व कापड असल्याने काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केला आहे.या आगीत कारखान्यातील सहा कामगार हे जखमी झाले असून ते एकंदरीत १० ते ५० टक्के भाजले असून त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.त्यांच्यावर महानगरपालिकेच्या शीव रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान यात जखमी झालेल्या कामगारांची नावे १) सलमान खान.२) मनोज ३) अमजद ४) सल्लाऊद्दीन ५) सैदुल रेहमान ६) रफीक अहमद अशी आहेत. मुंबईतील धारावी येथील अशोक मिल कंपाऊंड रोडवर सहा मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर गारमेंटची कंपनी असून आज पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास पहाटे 🔥 आग लागली त्यावेळी काही कामगार हे आपला जीव वाचवण्यासाठी कंपनीच्या बाहेर धाव घेतली.दरम्यान सदर घटनेची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली व कारखान्यात अडकलेल्या कामगारांची सुटका केली आहे.

Previous articleपुणे ‘ हिट अँड रन ‘ पोर्शे कारचा वेग ताशी १६० चा दुचाकीवरील दोघांचा मृत्यू. ‘ आर्टिफिशियल इंटेलिजन्स ‘ च्या मदतीने जिवंत करणार अपघाताची घटना पुणे गुन्हे शाखेचे पोलिस
Next articleपुण्यातील अपघाताच्या घटनास्थळाची पाहाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here