पुणे दिनांक २९ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्वव ठाकरे गटाचे नेते व राज्यसभा खासदार संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे.संजय राऊत यांनी दैनिक सामनाच्या दिनांक २६ मेच्या अग्रलेखात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत खळबळजनक दावा केला होता की.लोकसभा निवडणूकीत एकनाथ शिंदे यांनी पैशांचा अफाट वापर केला.
दरम्यान याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या वकिलामार्फत संजय राऊत यांना नोटीस पाठवली आहे.यात म्हटले आहे की तीन दिवसांत बिनशर्त माफी मागा.अन्याथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा.फौजदारी व दिवाणी खटला तुमच्या विरोधात व सामना या वर्तमानपत्राच्या विरोधात दाखल करण्यात येईल.असे या नोटीस मध्ये म्हटले आहे.दरम्यान या नोटिस नंतर शिवसेना उध्वव ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या एक्सवर म्हटले आहे की ” गैरसंवैधानिक मुख्यमंत्री श्रीमान शिंदे यांनी मला कायदेशीर नोटीस पाठवलीय. अतिशय मनोरंजक आणि राजकीय नोटीस आहे.अब आयेगा मजा .जय महाराष्ट्र” असं ट्विट करत म्हणाले आहेत.तसेच ते पुढे म्हणाले की ” ५० खोके एकदम ओके…आहे कहते हैं ऊलटा चोर कोतवाल को डाटे.”