पुणे दिनांक २९ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघातप्रकरणी पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 👮 सादर केलेल्या अहवालानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीने मोठी कारवाई करण्यात आली आहे.या प्रकरणी विभागाच्या वतीने ससून रुग्णालया मधील दोन डाॅक्टर व एक शिपाई यांना तातडीने निलंबित केले आहे.या तीन जणांना पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे.
दरम्यान याप्रकरणी अपघातामधील अल्पवयीन मुलाचे ब्लड मध्ये फेरफार प्रकरणात ससून रुग्णालयाचे डॉक्टर व शिपाई यांची पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कसून चौकशी केली आहे.अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवाल यांचे ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्यासह कोणी – कोणी फोन केले? याकरिता किती रक्कम ठरली होती व त्यापैकी किती रक्कम मिळाली होती? यांचा तपास पोलिस करीत आहेत.ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ.विनायक काळे.यांनी या तीन जणांना निलंबित केल्याची माहिती दिली आहे.यात डॉक्टर अजय तावरे.डाॅक्टर श्रीहरी हळनोर व शिपाई अतुल घटकांबळे या तीन जणांना निलंबित केले आहे.यांनी अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवाल याच्या ब्लड सॅम्पलच्या रिपोर्ट मध्ये फेरफार केल्याच्या आरोप झाला होता.या नंतर चौकशी समितीने तब्बल आठ तास तपास केला.यानंतर आज बुधवारी या तीन जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.