Home Breaking News पश्चिम बंगालमध्ये ईव्हीएम मशीनच दिले पाण्यात फेकून

पश्चिम बंगालमध्ये ईव्हीएम मशीनच दिले पाण्यात फेकून

556
0

पुणे दिनांक १ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पश्चिम बंगाल मध्ये आज शेवटच्या सातव्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी आज शनिवारी दिनांक १ जुन रोजी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे.अशातच पश्चिम बंगाल येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे.येथील  परगणा जिल्ह्यातील कुतताली मतदान केंद्रावर काही मतदारांनी चक्क ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी मशीन बळजबरीने तेथील कर्मचारी यांच्या ताब्यातून घेऊन ती केंद्राबाहेर असणाऱ्या एका पाण्याच्या डबक्यात फेकून दिली आहे.त्यामुळे आज सकाळीच या मतदान केंद्रावर एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान संपूर्ण भारतात अनेक मतदान केंद्रावर यापूर्वी लोकसभा निवडणुकीत मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनची तोडफोड व जाळणे तसेच फोडणे अशा अनेक घटना घडल्या आहेत.एकंदरीत या ईव्हीएम मशीनवरच मतदारांचा विरोध प्रचंड प्रमाणावर आहे असे दिसून आले आहे.दरम्यान आज या घडलेल्या घटनेची आता निवडणूक आयोगाच्या वतीने चौकशी केली जात आहे.

Previous articleपुण्यातील कल्याणीनगर येथील ‘ हिट अँड रन ‘ अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलांच्या आईलाही अटक
Next articleकेजरीवाल यांना बेल की जेल जामीन अर्जावर आज सुनावणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here