पुणे दिनांक १ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना वैद्यकीय कारणास्तव दाखल केलेल्या अंतरिम जामीन याचिकेवरील निर्णय दिल्लीच्या न्यायालयाने राखून ठेवला आहे.दरम्यान न्यायालयाने या निर्णयासाठी ५ जूनची तारीख निश्चित केलेली आहे त्यामुळे आज अरविंद केजरीवाल यांना कोर्टाकडून कोणताही दिलासा मिळाला नाही.आता केजरीवाल यांना उद्या तिहार तुरुंगात जावे लागणार आहे.दरम्यान यापूर्वी अरविंद केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीकरीता प्रचार करण्यासाठी कोर्टाने २१ दिवसांकरीता जामीन दिला होता.नंतर वैद्यकीय कारणास्तव ७ दिवस जामीन मिळावा म्हणून त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.पण तिथे त्यांना जामीन मिळाला नाही.त्या नंतर त्यांनी आज दिल्लीतील एव्हेन्यू कोर्टात याचिका दाखल केली होती.पण त्यांना आज दिलासा मिळाला नाही.उद्या केजरीवाल यांना दिल्लीतील तिहार तुरुंगात जावे लागणार आहे.