पुणे दिनांक १ जून ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील अरुणगाव येथे पोलिस पाटलांच्या एका अल्पवयीन मुलीने मालवाहू टेम्पोच्या सहाय्याने एका दुचाकीस्वारांला चिरडल्याची घटना घडली आहे.या अपघातात दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे.या अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वारांचे नाव अरुण मेमाणे असे आहे. दरम्यान या अपघाताबाबत शिरूर पोलिसांनी 👮 अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पुढील तपास शिरूर पोलिस करत आहेत.