पुणे दिनांक १ जुन (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) ल़ोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या सातव्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी सात वाजल्या पासून सुरुवात झाली आहे.एकूण आठ राज्यातील ५७ जागांवर हे मतदान होत आहे.मतदान सुरू होण्यापूर्वी मतदारांनी मतदान केंद्राबाहेर रांगा रांगा लावल्या आहेत.आज शनिवारी सकाळी मतदान सुरू होताच आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा यांनी पंजाब च्या मोहालीतील प्राथमिक शाळेतील केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे.
दरम्यान आज सातव्या टप्प्यातील या एकूण सात राज्यात एकूण सात जिल्ह्यात मतदान होत आहे. पंजाब येथील एकूण १३ जागांवर मतदान होत आहे. हिमाचल प्रदेशच्या एकूण ४ जागांवर मतदान होत आहे.उत्तर प्रदेशच्या एकूण १३ जागांवर मतदान होत आहे.पश्चिम बंगालच्या एकूण ९ जागांवर मतदान होत आहे.बिहारच्या एकूण ८ जागांवर मतदान होत आहे. ओडिशाच्या एकूण ६ जागांवर मतदान होत आहे.तर झारखंडमध्ये ३ जागांवर मतदान होत आहे.एकूण ९०४ उमेदवार हे आपले भवितव्य आज अजमावत आहे.आज शेवटच्या सातव्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी.केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर.ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी व लालूप्रसाद यादव यांच्या कन्या मीसा भारती व अभिनेत्री कंगना राणावत.हे आपले भवितव्य आज अजमावत आहे.तर आज शेवटच्या सातव्या टप्प्यातील मतदान सायंकाळी संपल्यानंतर एक्झिट पोलची आकडेवारी देखील समोर येइल.