Home क्राईम सांगवी पोलिस स्टेशनच्या हद्दीत इंद्रप्रस्थ सोसायटी येथील खून प्रकरणातील तीन आरोपींच्या...

    सांगवी पोलिस स्टेशनच्या हद्दीत इंद्रप्रस्थ सोसायटी येथील खून प्रकरणातील तीन आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

    265
    0

    पुणे दिनांक १ जून ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) सांगवी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील माहेश्र्ववरी चौकातील इंद्रप्रस्थ सोसायटी समोर पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगारांवर दिनांक २९ मे बुधवारी रात्रीच्या सुमारास दहा वाजण्याच्या सुमारास दीपक दत्तात्रय कदम ( वय ३० रा.जुनी सांगवी पुणे) यांच्यावर गोळ्या झाडून त्याचा खून केल्याप्रकरणी सांगवी पोलिसांनी तीन जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

    सांगवी पोलिसांनी 👮 अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे १) अमन राजेंद्र गिल ( वय १८ रा.नवी सांगवी पुणे) २) सौरभ गोकुळ घुटे ( वय२२ रा.जुनी सांगवी पुणे)  यांना शुक्रवारी औंध भागातून शुक्रवारी अटक करण्यात आली आहे.दरम्यान या प्रकरणी सांगवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील मयत दीपक हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.याचे साधारण २० दिवसांपूर्वी सुजल व अमन यांच्या बरोबर भांडण झाले होते.यावेळी दीपक यांने या दोघांना धमकावले होते.याचा राग धरून बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास माहेश्र्वरी चौकातील इंद्रप्रस्थ सोसायटी समोरील मुख्य रस्त्यावर या दोघांनी बाईक वरुन येऊन दीपक याच्यावर रिव्हालवर मधून दोन राऊंड फायर केले व घटनास्थळावरून पळून गेले जखमी झालेल्या दीपकला औंध येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.असे रुग्णालयातील डॉक्टर यांनी घोषित केले होते.दरम्यान या खूनानंतर सांगवी पोलिसांनी 👮 आरोपींच्या शोधासाठी पथके तयार करून त्यांचा शोध घेत होते.गुरुवारी अमन गिल याला अटक करण्यात आली होती.तर शुक्रवारी अन्य दोन आरोपी सुजलव सौरभ या दोघांना औंध येथून अटक करण्यात आली आहे.तरयातील अमन गिल हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहे.सदरची कामगिरी ही पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे.अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी.पोलिस उपयुक्त गुन्हे संदीप डोईफोडे.पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड. सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन हिरे.यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बनसोडे.सहाय्यक पोलिस निरीक्षक चक्रधर‌ ताकभाते.पोलिस उपनिरीक्षक किरण कणसे.पोलिस हवालदार प्रकाश शिंदे.विवेक गायकवाड.विजय मोरे.व प्रमोद गोडे.विनोद साळवे. राजेंद्र शिरसाट.नितीन काळे.विनायक डोळस.पोलिस नाईक.प्रविण पाटील.पोलिस अंमलदर आकाश खंडागळे.विजय पाटील.निलेश शिंगोटे.राजाराम माने. व सुहास डंगारे यांनी केली आहे.

    Previous articleपुण्यातील कर्वे रोडवर क्रेन खाली येऊन सायकल स्वाराचा मृत्यू
    Next articleपुण्यातील ‘ हिट अँड रन ‘ प्रकरणी ‘ आई व मुलाची समोरासमोर चौकशी ‘

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here