Home क्राईम हडपसर येथील भेकराईनगर येथे वाहनांची व दुकानांची तोडफोड करणाऱ्या आरोपींच्या पोलिसांनीही आवळल्या...

  हडपसर येथील भेकराईनगर येथे वाहनांची व दुकानांची तोडफोड करणाऱ्या आरोपींच्या पोलिसांनीही आवळल्या मुसक्या

  58
  0

  पुणे दिनांक २ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) हडपसर येथील फुरसुंगी येथील दुकानांची  व वाहनांची तोडफोड करुन या भागात दहशत निर्माण करणां-या दोघेजण व तीन अल्पवयीन मुले अशा एकूण पाच जणांच्या हडपसर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

  अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नावे १) विजय उर्फ धनप्पा बसवराज कुरले ( वय २२ रा.संजुदा  काॅम्प्लेक्स पापडेवस्ती ) २) माणिक नागेश सगर उर्फ वाढिव बबल्या ( वय १९.रा.शिवतेज नगर काळेपडळ) या प्रमाणे आहेत.या प्रकरणी योगेश दिंगबर बुधवंत (वय २६ रा.शिवसेना भवना जवळ माळवाडी हडपसर) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.या घटनेबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार योगेश यांचे भेकराईनगर येथे शंभू फाॅरमेन्स नावाने दुकान आहे.दुकानासमोरील वडाच्या झाडाखाली बसण्यासाठी विरोध केल्याने आरोपीनी बेकायदेशीर जमाव जमवून लाकडी दांडके व धारदार शस्त्राने दुकानांच्या काचा फोडल्या व बसच्या काचा फोडल्या तसेच ढमाळवाडी येथील ७ ते ८ वाहनांचे नुकसान केले.पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने पोलिस कस्टडी सुनवली आहे.या प्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बापूसाहेब खंदारे हे करीत आहेत.

  Previous articleपंजाबमध्ये दोन मालगाड्या आज पहाटे एकामेकांवर आदळून अपघात दोन चालक गंभीर रित्या जखमी प्रकृती चिंताजनक
  Next articleपुणे म्हाडा कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाड पावणेदोन लाखाची लाच घेताना प्रोजेक्ट मॅनेजरच्या आवळल्या मुसक्या

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here