पुणे दिनांक २ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) लोकसभा निवडणुकीच्या सातव्या व शेवटच्या टप्प्यातील मतदान हे शनिवारी दिनांक १ जून रोजी सायंकाळी संपल्यानंतर एक्झिट पोलच्या अंदाजा नुसार महाराष्ट्रात महायुतीच्या लोकसभा जागा कमी होणार .असे पोल आल्यानंतर.ही त्यांच्या कर्माची फळे असल्याची रोखठोक टीका मराठा आरक्षण संदर्भात राज्यात लढा देणारे व मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की एक्झिट पोल नुसार महाराष्ट्रात महायुतीला मोठ्या प्रमाणावर फटका बसताना एकंदरीत दिसत आहे.भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात तळ ठोकायची वेळ आली होती.आम्हाला कोणाच्या गुलालाचा आनंद नाही.कोणी निवडून आला काय आणि पडला काय ? आम्हाला फक्त मराठा आरक्षणाच्या गुलालात आनंद आहे.असे देखील यावेळी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.