Home कृषी मान्सूनपुर्व पावसामुळे पुणेकरांची तारांबळ एक तासात रस्ते झाले जलमय

  मान्सूनपुर्व पावसामुळे पुणेकरांची तारांबळ एक तासात रस्ते झाले जलमय

  250
  0

  पुणे दिनांक ३ जून ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यात मान्सूनपुर्व पावसाला सुरुवात झाली आहे.दरम्यान अचानकपणे पाऊस आल्याने पुणेकर नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.आज एक तास कोसळलेल्या पावसामुळे पुण्यातील वडाचीवाडी भागात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.याठिकाणी पावसामुळे रस्त्यांना तळ्याचे स्वरुप निर्माण झाले होते.यात अनेक ठिकाणी पाण्यात वाहनं अडकून पडली होती.व अचानकपणे आलेल्या पावसामुळे अनेक नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती.

  दरम्यान दुपारी अचानकपणे आलेल्या पावसामुळे  पुण्यातील वडाचीवाडी येथे एक तास तुफान पाऊस झाल्याने रोडवर एक फुटाच्या वर पाणी साचून या ठिकाणी रोडला तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले.व या पाण्यात अनेक वाहनं बंद पडल्याने अनेकजण आपली वाहने ढकलत नेत होते.तसेच अचानकपणे आलेल्या पावसामुळे हवेमध्ये आता चांगलाच गारवा निर्माण झाला आहे.अचानकपणे आलेल्या पावसामुळे पुणेकर नागरिकांची एकंदरीत चांगलाच गोंधळ उडाला आहे.

  Previous articleमान्सून ४ ते ५ दिवसांमध्ये दक्षिण महाराष्ट्रात.मुंब‌ई व अलिबागमध्ये पावसाला सुरुवात
  Next articleमुख्यमंत्र्यांनी घेतला दुष्काळाचा आढावा ,६जूनला दुष्काळाबाबत घेणार म्हत्वाची बैठक

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here