पुणे दिनांक ३ जून ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाला जोरात सुरुवात झाली आहे.यात कल्याण डोंबिवली व अलिबागमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे.तर अलिबाग तालुक्यात काही ठिकाणी तुफान पावसाला सुरुवात झाली आहे.तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार मान्सून पूर्व पावसाला सुरुवात झाली आहे.तसेच हिंगोली जिल्ह्यात देखील आज मान्सून पूर्व पावसाला सुरुवात झाली आहे.
दरम्यान मान्सून वेळेआधीच केरळमध्ये दाखल झाला आहे.त्यानंतर आज मान्सूनने केरळ मधील मुक्काम हालविला आहे.मान्सून आज कर्नाटक.रायलसीमा व तेलंगण तसेच बंगालच्या उपसागरात मान्सूनने आगमन केले आहे.तसेच नैऋत्य मोसमी वारे येत्या ४ ते ५ दिवसांत महाराष्ट्राच्या दक्षिण भागात दाखल होतील.असा अंदाज भारतीय हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आला आहे.४ जूनला रत्नागिरी. सिंधुदुर्ग.पुणे.कोल्हापूर.सातारा.सांगली.सोलापूर.तसेच अहमदनगर.बीड.नागपूर.येथे पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.