Home राजकीय मुख्यमंत्र्यांनी घेतला दुष्काळाचा आढावा ,६जूनला दुष्काळाबाबत घेणार म्हत्वाची बैठक

    मुख्यमंत्र्यांनी घेतला दुष्काळाचा आढावा ,६जूनला दुष्काळाबाबत घेणार म्हत्वाची बैठक

    355
    0

    पुणे दिनांक ३जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) जेष्ठ नेते शरद पवार यांच्या पत्रानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चांगलेच अॅक्शन मोडवर आले आहे दरम्यान त्यांनी आज सोमवारी तातडीने राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला आहे.आचार संहितेचा अडथळा येऊ न देता तत्काळ मदत करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रशासनाला दिले आहेत.दरम्यान महाराष्ट्रातील दुष्काळा बाबत काही दिवसांपूर्वी जेष्ठ नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारचे लक्ष वेधले होते.व तसे पत्रच पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लिहित दुष्काळाबाबत संघर्ष करण्याचा इशाराच दिला होता.

    दरम्यान या पत्रानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे  चांगलेच अॅक्शन मोडवर आले.व त्यांनी दुष्काळा बाबत राज्यातील प्रशासकीय अधिकारी यांना तसे आदेश दिले आहेत.तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यातील दुष्काळाबाबत दिनांक ६ जूनला चर्चा करण्यासाठी सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांची बैठक बोलावली आहे.या बैठकीत राज्यातील दुष्काळी परिस्थिती कशी हाताळावी? तसेच पाण्याचे नियोजन,यावर बैठकीत चर्चा होणार आहे.सदरची चर्चा ही सह्याद्री अतिथीगृहावर दुपारी ३.३० वाजता बैठक होणार आहे.दरम्यान आज जेष्ठ नेते शरद पवार यांनी आक्रमक होत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील दुष्काळाबाबत उपायोजना न केल्यास आक्रमक भूमिका घेण्याचा इशाराच दिला होता.

    Previous articleमान्सूनपुर्व पावसामुळे पुणेकरांची तारांबळ एक तासात रस्ते झाले जलमय
    Next articleविभागीय आयुक्तांची मतमोजणी केंद्रांना भेट, मतमोजणी सुरळीतपणे पार पाडा- डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here