पुणे दिनांक ३ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज सोमवारी भारतीय अन्न महामंडळाचे गोदाम कोरेगाव पार्क येथील पुणे व बारामती लोकसभा मतदार संघा मतमोजणी केंद्र शिवछत्रपती क्रीडा संकुल वेटलिप्टिंग हाॅल बालेवाडी येथील मावळ लोकसभा मतदारसंघा मतमोजणी केंद्र आणि महाराष्ट्र औद्योगिक वखार महामंडळाचे गोदाम रांजणगाव ( कारेगाव) येथील शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रास भेट देऊन पाहणी केली आहे.
दरम्यान यावेळी मावळचे निवडणूक अधिकारी दीपक सिंगला.बारामती निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी शिरूरचे निवडणूक अधिकारी अजय मोरे. तसेच उपआयुक्त वर्षा लढ्ढा -उंटवाल.उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर.आदी यावेळी उपस्थित होते.दरम्यान मतमोजणी प्रक्रिया पार पाडताना नियुक्त करण्यात आलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपसात समन्वय ठेवून भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पणे पालन करुन मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी असे निर्देश यावेळी डॉ.पुलकुंडवार यांनी दिले आहे.