पुणे दिनांक ३ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार मुंबईतील लोअर परळ येथील एका इमारतीला आग 🔥 लागल्याची घटना घडली असून.आग लागताच मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या आहेत.यात चार अग्निशमन दलाच्या गाड्याचा यात समावेश आहे.आग लागल्यानंतर या भागात नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान या आगीच्या घटनेबाबत सूत्रांकडून समजते की मुंबईतील लोअर परळ येथील शाह अॅड नाहर इंडस्ट्रीतील एका गाळ्याला आग लागल्यानंतर या आगीची घटना तातडीने अग्निशमन दलाच्या जवानांना देण्यात आली.आगीची माहिती मिळाल्यानंतर तातडीने अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या व सदरची आगीवर नियंत्रण मिळवले.अशी माहिती मिळत आहे.