पुणे दिनांक ४ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच सकाळी हाती आलेल्या अपडेट नुसार मुंबईतील मध्यरेल्वेची वाहतूक व्यवस्था कोलमडली असल्याची माहिती मिळत आहे.परळ रेल्वे स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल कुर्ला स्थानकापर्यंतच चालवल्या जात आहे.अशी माहिती मिळत असून यामुळे मुंबईकडू जाणाऱ्या वाहतुकीवर यांचा परिणाम झाला आहे.
दरम्यान आज दिनांक ४ जून मंगळवारी पहाटे पावशे पाच वाजण्याच्या सुमारास परळ येथील रेल्वे स्थानकात सिग्नल यंत्रणांमध्ये बिघाड झाल्याने पहाटे पाच वाजल्या पासून मध्य रेल्वेची वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे.आता घटनास्थळी रेल्वेचे कर्मचारी व अधिकारी हे पोहोचले असून बिघाड झालेल्या सिग्नल यंत्रणा दुरुस्ती करण्याचे काम सुरू आहे.अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून मिळत आहे.