पुणे दिनांक ४ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज महाराष्ट्रात मुसाळधार पाऊसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.तर काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.आज भारतीय हवामान विभागाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या अंदाजानुसार आज मुंबईसह उपनगरात मध्यम ते हालक्या सरी कोसळतील.पुण्यात देखील मुसळधार पाऊसाचा इशारा देण्यात आला आहे.आज प्रामुख्याने कोकणातील रायगड.रत्नागिरी . सिंधुदुर्ग.या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.तसेच सातारा. सांगली.सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यात देखील दमदार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान विदर्भात व मराठवाड्यात काही भागात आज पासून पुढील ३ ते ४ दिवस मान्सूनपूर्व पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.यात प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर.नांदेड . लातूर.धाराशिव.व बीड या जिल्ह्यात ढंगाच्या गडगडाट व विजांच्या कडकडाटात मुसाळधार पाऊस होईल.असा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आला असून या भागातील शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वीची कामे तातडीने आटोपून घ्यावी असा सल्ला देखील दिला आहे. भारतीय हवामान खात्याच्या इशा-या नुसार केरळ मधून मान्सून पुढे सरकाला आहे.कर्नाटक.अंध्राप्रदेश तामिळनाडूत दाखल झाला असून येत्या २४ तासात मान्सून कोकण व नंतर पुण्यात दाखल होवू शकतो. तसेच पुढील ५ दिवसात मोसमी वारे संपूर्ण महाराष्ट्रात व्यापून शकतात असा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात येत आहे.