Home Breaking News उपमुख्यमंत्री पदावरून मला मुक्त करा पक्ष नेतृत्वाकडे करणार मागणी – देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री पदावरून मला मुक्त करा पक्ष नेतृत्वाकडे करणार मागणी – देवेंद्र फडणवीस

257
0

पुणे दिनांक ५ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या खराब कामगिरीची जबाबदारी घेतली आहे.तसेच यापुढे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या कामा करीता मला पूर्णवेळ मिळावा म्हणून मला उपमुख्यमंत्री पदावरून मुक्त करा.मला राज्यातील मंत्री मंडळातून बाहेर पडण्याची इच्छा आहे.असे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत म्हणाले.यामुळे आता महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीत खूप मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळाले नाही.काल लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर या पराभावाची जबाबदारी स्वीकारून भारतीय जनता पार्टीचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात अपेक्षाप्रमाणे यश न मिळाल्याने देवेंद्र फडणवीस यांनी आपली इच्छा बोलून दाखवली आहे.दरम्यान आज बुधवारी लोकसभा निवडणुकीचे विश्लेषण करण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते.यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील पक्षाच्या अपयशाची जबाबदारी स्वीकारली. महाराष्ट्रात जो पराभव झाला.जागा कमी आल्या यांची मी जबाबदारी स्वीकारतो.व मी मान्य करतो की मी कुठेतरी कमी पडलो.आणि ती कमतरता भरून काढण्याचा मी प्रयत्न करणार आहे.मी पक्ष नेतृत्वाला विनंती करतो की आता मला येणाऱ्या विधानसभा निवडणुकी करीता पूर्णवेळ उतरायचे आहे.याकरीता मला सरकार मधून मोकळं करावं ज्या मुळे राहिलेल्या कमतरता पूर्ण करण्यासाठी मला वेळ देता येईल.असे ते म्हणाले.मी बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये जे काही करायचं आहे.ती आमची टीम करेल . त्यांच्यासोबत मी असणार आहे.यासाठी मी पक्षातील वरिष्ठांशी मी भेटणार आहे.व आणि ते सांगतील ते मी करेन असे देखील फडणवीस म्हणाले आहे.

Previous articleलोकसभा निवडणूक मतमोजणीपूर्वीच बाॅम्बस्फोट
Next articleआज शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त रायगडावर मोठी गर्दी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here