Home Breaking News अजित पवार यांनी मुंबईत ट्रायडंट हाॅटेलमध्ये बोलावलेल्या बैठकीला पाच आमदारांची दांडी पुण्यातील...

अजित पवार यांनी मुंबईत ट्रायडंट हाॅटेलमध्ये बोलावलेल्या बैठकीला पाच आमदारांची दांडी पुण्यातील दोन आमदारांचा समावेश

268
0

पुणे दिनांक ६ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला फक्त एकच जागेवर यश मिळाले आहे.या सर्व पार्श्वभूमीवर आज अजित पवार यांनी सर्व आमदारांची बैठक ही मुंबईतील ट्रायडंट हाॅटेल मध्ये बोलाविण्यात आली होती.सदरच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीतल निकालाबाबत चिंतन करण्यात आले. दरम्यान अजित पवार यांच्या गटात आता एकूण ४१ आमदार आहेत.या बैठकीला पुण्यातील दोन आमदारा सह एकूण पाच आमदार यांनी दांडी मारल्याची माहिती समोर येत आहे.तर बैठकीत उपस्थित असणाऱ्या अन्य आमदार यांनी पराभव झाला तरी चालेल पण अजित दादा यांची साथ सोडणार नाही अशी ग्वाही या आमदारांनी आज गुरुवारी झालेल्या बैठकीत दिली आहे.

दरम्यान या बैठकीला दांडी मारणाऱ्या पाच आमदार यांची नावे १) नरहरी झिरवळ २) सुनिल टिंगरे ३) राजेंद्र शिंगणे ४) अण्णा बनसोडे ५) धर्मराव बाबा आत्राम .यांचा समावेश आहे.या सर्व आमदारांनी आप आपली कारणे पक्षाला कळवली आहेत.पण त्यांच्या अनुपस्थितीवरुन मात्र राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.दरम्यान काही दिवसांत  महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका लागणार असून आता नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीतून महाराष्ट्रातील जनतेचा मूड पाहता अजित पवार यांच्या गटातील आमदार जेष्ठ नेते शरद पवार यांच्या गटाची साथ धरणार का ? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.यातच विशेष म्हणजे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.अजित पवार गटाचे व भारतीय जनता पार्टीचे काही आमदार आमच्या संपर्कांत आहे.असे म्हणले आहे.त्यानंतर आता अजित पवार देखील सतर्क झाले आहेत.पण आजच्या अजित पवार यांच्या बैठकीला ट्रायडंट हाॅटेलमध्ये बैठकीला उपस्थित असलेल्या आमदारांनी मात्र आपण अजित पवार यांच्या बरोबर राहणार असल्याचीही ग्वाही दिली आहे.

Previous articleपाटणा ते झारखंड रेल्वे पॅसेंजरच्या डब्यांना भीषण आग, 🔥 ट्रेन मधून उड्या मारत प्रवाशांनी वाचवला जीव
Next articleसमृध्दी महामार्गावर स्कार्पिओची आयशर टेम्पोला दिलेल्या धडकेत तीन जणांचा मृत्यू.अन्य प्रवासी गंभीर जखमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here