Home Breaking News अभिनेत्री व नवनिर्वाचित भाजपच्या खासदार कंगना राणावतच्या 👂 कानाखाली सुरक्षारक्षक महिलेने लगावाली...

अभिनेत्री व नवनिर्वाचित भाजपच्या खासदार कंगना राणावतच्या 👂 कानाखाली सुरक्षारक्षक महिलेने लगावाली चंदीगड विमानतळावरील घटना

74
0

पुणे दिनांक ६ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) नवनिर्वाचित खासदार व सुप्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावत ह्या आज दिल्लीत भारतीय जनता पक्षाच्या मिटिंगमध्ये जाण्यासाठी चंदीगडच्या विमान तळावर दाखल झाल्या होत्या.विमानतळावर सुरक्षा साठी तैनात असलेल्या सीआय‌एस‌एफच्या महिला सुरक्षा रक्षक कुलविंदर कौर यांनी कंगनाच्या कानशिलात लगवल्याची घटना आज गुरुवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.याबाबत आता कंगना राणावत यांनी या महिला सुरक्षा रक्षक महिलेच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी विमानतळावरील सुरक्षा अधिकारी यांच्याकडे केली आहे.

दरम्यान याप्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार कंगना राणावत या भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर मंडी लोकसभा मतदारसंघातून नुकत्याच झालेल्या निवडणुकीत निवडून आल्या आहेत.त्या आज चंदीगड येथील विमानतळावरुन दिल्ली येथे जाण्यासाठी निघाल्या होत्या.त्या दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास विमानतळावर पोहोचल्या असता तिथे दुटीवर कार्यरत असलेल्या सीआय‌एस‌एफ घ्या महिला सुरक्षा रक्षकाने कंगना राणावत यांच्या कानशिलात लगवल्याची घटना घडली आहे.दरम्यान कंगना राणावत यांनी शेतकरी आंदोलना विरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी महिला सुरक्षा रक्षक कुलविंदर कौर यांनी कंगनाच्या कानशिलात लगवल्याची माहिती मिळत आहे.या घटनेनंतर कंगना यांनी चंदीगड पोलिसांकडे तक्रार दाखल केली.व त्या विमानाने दिल्लीला रवाना झाल्या आहेत.

Previous articleलोकसभेचा निकाल लागताच आज राज्य मंत्रिमंडळाची म्हत्वाची बैठक सुरू.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्ली दरबारी दाखल
Next articleपाटणा ते झारखंड रेल्वे पॅसेंजरच्या डब्यांना भीषण आग, 🔥 ट्रेन मधून उड्या मारत प्रवाशांनी वाचवला जीव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here