पुणे दिनांक ६ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५१ वा आज गुरुवार दिनांक ६ जून ला शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.यानिम्मिताने अनेक शिवभक्त हे रायगडावर दाखल झाले आहेत. आज संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण पसरले आहे.दरम्यान शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने कोल्हापूर येथील नवीन राजवाड्यात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.खासदार शाहू छत्रपती व छत्रपती कुटुंबातील अन्य सदस्य व कोल्हापूरातील तमाम नागरिकांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.