पुणे दिनांक ६ जून ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांचे स्विस सहाय्यक राहुल झावरे यांना पारनेर येथील भर चौकात पराभूत खासदार सुजय विखे याचे समर्थक व कार्यकर्ते ८ ते १० जणांनी मिळून मारहाण करून त्यांची कार फोडून त्यांना गंभीर रित्या जखमी केल्या प्रकरणी राहुल झावरे यांनी पारनेर पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास करीत सुजय विखे यांचे समर्थक विजय औटी व नंदू औटी व अन्य एक अशा तीन जणांना अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.