पुणे दिनांक ६ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) चेंबूरमध्ये दुकानात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आहे.या स्फोटात दुकानाचे छत कोसळले व अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे.यात नऊ जण गंभीर रित्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तर घटना स्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत.
दरम्यान या आगीच्या घटनेबाबत सूत्रांकडून माहिती मिळाली की चेंबूर येथील कॅम्प येथील एका दुकानात आज गुरुवारी सकाळी सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग लागली या स्फोटात दुकानाचे छत कोसळले आहे तर.दुकानासमोरील वाहनांचे नुकसान झाले आहे.या हा स्फोट एवढा मोठा होता की यात नऊजण गंभीर रित्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.आता त्यांच्या वर उपचार सुरू आहेत.अग्निशमन दलाचे जवान हे घटनास्थळी दाखल झाले असून ते आगीवर नियंत्रण मिळवता आहे.या आगीत दुकान मालकाचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले आहे.सदर घटनेची पाहाणी अग्निशमन दलाचे जवान करत आहेत.