पुणे दिनांक ६ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पाटण्यात वरुन झारखंडला जाणाऱ्या रेल्वे पॅसेंजर ट्रेनच्या डब्याला अचानकपणे भीषण आग लागली आहे.सर्व प्रथम एका डब्याला आग लागली व नंतर आणखी एका डब्याला आग लागली.व सदरची आग 🔥 पसरण्याआधी पॅसेंजर मधील प्रवाशांनी जीवाच्या आकांताने उड्या मारल्याने अनेक प्रवाशांचा या दुर्दैवी घटनेत जीव वाचला आहे.काही मिनिटात पॅसेंजरचे दोन डब्बे या आगीत जळून खाक झाले आहेत.
दरम्यान या घटनेची माहिती रेल्वे प्रशासनाकडून अग्निशमन दलाच्या जवानांना दिल्यानंतर अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले.व आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.दरम्यान ही आग किउल जंक्शनच्या प्लॅट फाॅर्म क्रमांक चारवर ही आग लागल्याची घटना घडली आहे. दरम्यान या आगीच्या घटनेबाबत रेल्वेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही पॅसेंजर रेल्वे ट्रेन लखीसरायच्या किउल रेल्वे जंक्शन डाउन लाईनवर थांबली होती.यावेळी आज गुरुवारी सायंकाळच्या सुमारास ट्रेनला भीषण आग लागली.रेल्वेच्या मधोमध असलेल्या डब्याला आग लागल्यानंतर या डब्यातील प्रवाशांनी जीवाच्या आकांताने उड्या मारल्या व आपला जीव वाचविला आहे.यानंतर काही मिनिटांतच रेल्वेचे दोन डब्बे या आगीत जळून खाक झाले आहेत. दरम्यान या पॅसेंजरला नेमकी आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.