पुणे दिनांक ६ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून अहमदनगर लोकसभा निवडणूक जिंकलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांचे पी ए.राहुल झावरे यांच्यावर पराभाव झालेले सुजय विखे यांच्या समर्थकांनी प्राणघातक हल्ला केला आहे.
दरम्यान या घटनेबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांचे स्विय सहाय्यक राहुल झावरे यांच्यावर सुजय विखे समर्थक विजय औटी यांच्यासह ८ ते ९ जणांनी मिळून हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. यावेळी राहुल झावरे यांच्या कारची देखील तोडफोड करत त्यांना बेदम मारहाण केली आहे.या मारहाणीत झावरे हे गंभीर रित्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.