पिंपरी -चिंचवड ६ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पिंपरी चिंचवड येथील कुदळवाडी येथे असणा-या औद्योगिक वसाहतीतील आज गुरुवारी एका कंपनीला भीषण आग लागली आहे.सदरची कंपनीत रबर मॅन्युफॅक्चरिंग करणारी कंपनी असल्याची माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.दरम्यान ही आग एवढी भयानक होती की या कंपनीच्या शेजारच्या दोन कंपन्यांना देखील आग लागली आहे.या भीषण आगीत एकूण तीन कंपन्या जळून खाक झाल्या आहेत.आगीची माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती मिळताच घटनास्थळी ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून ते आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.