पुणे दिनांक ६ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम ) लोकसभेचा निकाल लागताच आज मुंबईत राज्य मंत्रिमंडळाची म्हत्वाची बैठक होत आहे.सदरची बैठक ही दुपारी चार वाजता सह्याद्री अतिथीगृहावर सुरू झाली आहे.दरम्यान आज मंत्रीमंडळाच्या बैठकी मध्ये अनेक म्हत्वाचे निर्णय घेण्यात येणार आहे. येऊ घातलेल्या विधानसभांच्या निवडणूकीचा पार्श्वभूमीवर तसेच महाराष्ट्रात आता झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये महायुतीच्या कमी झालेल्या जागा बाबत आजच्या बैठकीत काय निर्णय घेतला जातो हे पण पाहणे महत्त्वाचे आहे.
दरम्यान आज मुंबईत मंत्रीमंडळाची बैठक ही सह्याद्री अतिथीगृहावर होत असली तरी महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुका मध्ये महायुतीला चांगलाच फटका बसला आहे.यात तीन विद्यमान मंत्री यांचा दारुण पराभव झाला आहे.व मागील २०१९ मध्ये भाजपच्या एकूण २३ जागा होत्या यात मोठी घट होऊन यावेळी फक्त भाजपच्या पारड्यात फक्त नऊच जागा मिळाल्या आहेत.त्यामुळे केंद्रीय नेतृत्व महाराष्ट्रा तील भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर नाराज झाल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पराभावाची जबाबदारी स्वीकारून मला उपमुख्यमंत्री पदावरून पायउतार करा .अशी मागणी केंद्रीय नेतृत्वा कडे करणार आहे.असे काल पत्रकार परिषद घेऊन म्हटले होते.व मला येऊ घातलेल्या विधानसभांच्या निवडणूकीसाठी मला पूर्णवेळ काम करण्यासाठी वेळ द्यावा.असे ते म्हणाले होते.व ते आज होत असलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीला ते अनुपस्थित असून ते तातडीने नागपूर येथून दिल्ली दरबारी दाखल झाले आहेत.