Home क्राईम समृध्दी महामार्गावर स्कार्पिओची आयशर टेम्पोला दिलेल्या धडकेत तीन जणांचा मृत्यू.अन्य प्रवासी गंभीर...

  समृध्दी महामार्गावर स्कार्पिओची आयशर टेम्पोला दिलेल्या धडकेत तीन जणांचा मृत्यू.अन्य प्रवासी गंभीर जखमी

  60
  0

  पुणे दिनांक ७ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार समृद्धी महामार्गावर भाविकांची स्कार्पिओ जीपने आयशर टेम्पोला जोरात धडकून झालेल्या अपघातात जीप मधील तीन जणांचा मृत्यू झाला आहे.सदरची घटना ही समृद्धी महामार्गावर वैजापूरच्या जांबरगाव टोलनाका येथे घडली आहे.अपघात ग्रस्त स्कार्पिओ जीप मधील प्रवाशी हे नाशिक येथे देवदर्शनाला गेले होते.यात अन्य प्रवासी हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  दरम्यान या अपघाताबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार.समृध्दी महामार्गावर वैजापूर येथील जांबरगाव टोलनाका येथे सदरचा अपघात झाला आहे.भरघाव वेगाने येणाऱ्या स्कार्पिओ जीपने आयशर टेम्पोला पाठीमागून जोरात धडक दिल्याने जीपच्या पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. जीप मधील प्रवाशी हे छत्रपती संभाजीनगर येथील पैठण तालुक्यातील असून ते नाशिक येथे देवदर्शनाला गेले होते.व परतत असताना हा अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर अन्य प्रवासी हे गंभीर रित्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी मध्ये लहान मुलाचा समावेश आहे.

  Previous articleअजित पवार यांनी मुंबईत ट्रायडंट हाॅटेलमध्ये बोलावलेल्या बैठकीला पाच आमदारांची दांडी पुण्यातील दोन आमदारांचा समावेश
  Next articleरामोजी फ्लिम सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे आज पहाटे दु:खद निधन

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here