पुणे दिनांक ८ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील कल्याणीनगर येथील ‘ हिट अँड रन ‘ अपघातात अल्पवयीन मुलाचे वडिल व आजोबा यांना पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली असून. आता या बाप आणखी लेकावर सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांच्यावर पुणे पोलिसांनी आणखी एक गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी शब्बीर मोमीन यांनी या दोघा बाप लेकांविरुध्द तक्रार दाखल केल्यानंतर मोमीन यांच्या तक्रारीवरून या दोघांवर फसवणूक व जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याबाबत आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान जमिनीच्या व्यवहारातून आर्थिक फसवणूक व जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार मोमीन यांनी पोलिसांकडे दिली होती.सदर तक्रारी नंतर पोलिसांनी या दोघा बाप बेट्यावर गुन्हा दाखल केला आहे.