Home क्राईम पुण्यातील कोंढव्यात खड्ड्यात पडून चारपैकी एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू

  पुण्यातील कोंढव्यात खड्ड्यात पडून चारपैकी एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू

  67
  0

  पुणे दिनांक ८ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पुण्यातील कोंढव्यातील गगन उन्नती सोसायटी येथे रोडच्या कामा साठी खोदण्यात आलेल्या एका मोठ्या खड्ड्यातील पाण्यात पडून एका मुलीचा दुर्दैवी असा मृत्यू झाला आहे.या घटनेबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार कात्रज-कोंढवा रोडचे रुंदी करणांचे काम सुरू आहे.यासाठी येथे ११५ फूटाचा मोठा खड्डा खोदण्यात आला होता.यामध्ये पावसाचे पाणी साचले होते.या भागात तात्पुरत्या स्वरूपात झोपड्या टाकण्यात आल्या होत्या.येथे राहणाऱ्या ४ मुली कपडे धुण्यासाठी आल्या होत्या.कपडे धुताना पाय घसरून त्या या खड्ड्यात पडल्या यातील तीन जणी वाचल्या आहेत तर एका मुलीचा या खड्ड्यात पडून मृत्यू झाला आहे.

  Previous articleअंबड तालुक्याचे तहसिलदारांनी घेतली उपोषणकर्ते मनोज जरांगेची भेट
  Next articleमै नरेंद्र दामोदरदास मोदी ईश्वर की शपथ लेता हूॅं… नरेंद्र मोदींनी घेतली तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here