Home Breaking News मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे आजपासून अंतरवाली सराटीत उपोषण सुरु

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे आजपासून अंतरवाली सराटीत उपोषण सुरु

68
0

पुणे दिनांक ८ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठा समाजाचे नेते व आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे आज शनिवार दिनांक ८ जून पासून मराठा आरक्षण व सगेसोयरेच्या अंमलबजावणी व ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासाठी आज सकाळी दहा वाजल्यापासून उपोषणाला सुरुवात केली आहे.दरम्यान पोलिस प्रशासनाकडून त्यांच्या उपोषणाला परवानगी नाकारली आहे ‌तरी ते उपोषणा वर ठाम आहेत.राज्य सरकारने सगेसोयरे व ओबीसी मधून आरक्षण नाही दिले तर तीन महिन्यांत येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात २८८ जागी उमेदवार ऊभे करणार आहेत.

दरम्यान याबाबत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की सध्या पाऊसाचे दिवस आहेत.शेतकरी मित्रांनी प्रथम शेतात खरीपाच्या पेरण्या करुन घ्या व नंतर सहभागी व्हावे.तोपर्यंत आम्ही आरक्षणासाठी गड लढवत आहे.दरम्यान यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की राज्यातील सर्व आमदारांनी मुख्यमंत्री यांना सांगावे की त्यांचे आरक्षण त्यांना देऊन टाका नंतर मराठा समाज तुमचे काही देखील ऐकणार नाही. आज अंतरवाली सराटीत उपोषणाच्या ठिकाणी जय्यत तयारी केली आहे.पावसाळ्याचे दिवस असल्याने टीन पत्र्याचे शेड उभारण्यात आले आहे. उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी येणाऱ्या लोकांची सोय करण्यात आली आहे.तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.यात  १ डिवाय‌एसपी.४ पीआय.१४ पीएसआय.२७५ पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.यात १२० एस‌आरपीएफचे जवान.२४ दंगा नियंत्रण पथकाचा समावेश आहे.एवढ्या बंदोबस्तानंतर अंतरवाली सराटीत पोलिसांच्या छावणीचे स्वरूप आले आहे.

Previous articleरामोजी फ्लिम सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे आज पहाटे दु:खद निधन
Next articleमहाबळेश्वर मधील अग्रवालच्या अनधिकृत एमपीजी क्लबवर शिंदे सरकारचा ‘बुलडोझर’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here