पुणे दिनांक ८ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) चित्रपट जगाताचे सम्राट रामोजी राव यांचे आज हैदराबाद येथील रुग्णालयात पहाटे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले आहे.वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.तब्बेत बिघाडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात होते.
तेलंगणा व आंध्रा प्रदेशात रामोजी राव यांचे नाव मोठे होते.रामोजी राव हे रामोजी फ्लिम सिटीचे संस्थापक होते.याच बरोबर माध्यम संस्थेत मोठे योगदान होते. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी दु:ख व्यक्त केले आहे. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे.त्यांना उपचारासाठी हैदराबाद येथील नानाक्रमगुडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.