पुणे दिनांक ८ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघात ‘ हिट अँड रन ‘ प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांचे सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर येथील पंचतारांकित हॉटेल बार यापूर्वी सील करण्यात आले होते.त्यानंतर आज शनिवारी या एमपीजी कल्बवर प्रशासनाच्या वतीने बुलडोझर चालवण्यात आला आहे .या एमपीजी कल्बवर अनियमितता असल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा येथे त्यांच्या फार्म हाऊसवर मुक्कामी असताना कारवाईचे आदेश प्रशासनाला दिले होते.त्या नंतर सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने ही बोलडोजर कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान याप्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार सुरेंद्र अग्रवाल यांच्या मालकीचे बारमध्ये नियमांचं उल्लंघन करण्यात आले होते.त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने यापूर्वीच हा बार सील केला होता.हे हाॅटेल सरकारी जमिनीवर बेकायदेशीर असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.त्यामुळे यात अनियमितता होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून हाॅटेलवर बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे.असे सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.