Home Breaking News मै नरेंद्र दामोदरदास मोदी ईश्वर की शपथ लेता हूॅं… नरेंद्र मोदींनी घेतली...

मै नरेंद्र दामोदरदास मोदी ईश्वर की शपथ लेता हूॅं… नरेंद्र मोदींनी घेतली तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ

410
0

पुणे दिनांक ९ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर आज १८व्या लोकसभेची स्थापना झाली आहे.मोदी सरकारचा तिसऱ्यांदा शपथविधी सोहळा आज सायंकाळी सात वाजता राष्ट्रपती भवनात पार पडला आहे. दरम्यान पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी यापूर्वी सलग तीनवेळा पंतप्रधानपद भुषविले होते.त्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे दुसरे व्यक्ती ठरले आहेत.

आज रविवार दिनांक ९ जून रोजी सायंकाळी सात वाजता मोदी सरकारचा तिसऱ्यांदा शपथविधी सोहळा आज नुकताच पार पडला आहे.या सोहळ्यात नरेंद्र मोदी यांनी आज सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे.मोदी यांच्या बरोबर त्यांच्या मंत्रिमंडळात सामील होणाऱ्या काही मंत्र्यांनी आज गोपनीयतेची शपथ घेतली आहे.दरम्यान आज महाराष्ट्रातून नितीन गडकरी.पियुष गोयल.तसेच मुरलीधर मोहोळ.रक्षा खडसे.एकनाथ शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव.व रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मोदींच्या या मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे.

Previous articleपुण्यातील कोंढव्यात खड्ड्यात पडून चारपैकी एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू
Next articleभाविकांच्या लक्झरी बसवर काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला,१० भाविकांचा मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here