Home Breaking News इर्टिगा कार व बोलेरा जीपची समोरासमोर भीषण धडक, अपघातात चार जणांचा मृत्यू

इर्टिगा कार व बोलेरा जीपची समोरासमोर भीषण धडक, अपघातात चार जणांचा मृत्यू

64
0

पुणे दिनांक १० जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार उत्तर प्रदेश येथील अमरोहा जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे.हसनपूर-गजरौला मार्गावरील मनोटा पुलावर इर्टिगा कार व बोलेरा जीपची समोरासमोर धडक झाली.या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे.या भीषण अपघातात जीवा भावाच्या चार मित्रांचा मृत्यू झाला आहे.तर अन्य दोन जण गंभीर रित्या जखमी झाले आहेत.

दरम्यान या अपघाताबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यात मृत्यू झालेल्या चार जणांची नावे १) शाहनवाज ( १९) २) अबाद्दन (वय १८) ३) तहसीम ( वय १७) ४) बबलू (वय १७ ) अशी आहेत.तर यातील जखमींना तातडीने उपचारासाठी रूग्णांलयात दाखल करण्यात आले आहे.यातील मृत व्यक्ती हे अल्लीपूर येथील गजरौला येथील रहिवासी आहेत.याचे मृतदेह हे पोस्टमार्टम साठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.हे सर्वजण जेवणा साठी रविवारी मध्यरात्री गेले होते.जेवण करुन परतत असताना हा अपघात झाला आहे.या अपघात प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.

Previous articleमुंबईला मुसाळधार पाऊसाने झोडपले,तर ‘ या’ जिल्ह्यात पडणार मुसाळधर पाऊस
Next articleगोंदियामध्ये खासगी ट्रॅव्हल्स बसवरील चालकांचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात ,१०ते १२ जण जखमी दोघांची प्रकृती चिंताजनक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here