Home क्राईम गोंदियामध्ये खासगी ट्रॅव्हल्स बसवरील चालकांचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात ,१०ते १२ जण...

    गोंदियामध्ये खासगी ट्रॅव्हल्स बसवरील चालकांचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात ,१०ते १२ जण जखमी दोघांची प्रकृती चिंताजनक

    153
    0

    पुणे दिनांक १० जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार गोंदिया येथे खासगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बस वरील चालकांचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला असून या अपघातात एकूण १० ते १२ प्रवासी हे गंभीर रित्या जखमी झाले आहेत.यातील दोन प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे.ही खासगी कंपनीचे बस कोहमारा येथून गोंदिया कडे जात असताना हा भीषण अपघात झाला आहे.

    दरम्यान या अपघाताबाबत पोलिस सूत्रांकडून माहिती अशी मिळाली की या बसला एसटी महामंडळाच्या बसने कट मारला .व बस चालकाने एका ट्रकला वाचवण्यासाठी प्रयत्न केला असता ही बस रोडच्या कडेला उतरली व चालकांचे नियंत्रण सुटल्याने एका मिलच्या गेटला धडकून अपघात झाला आहे.यात खासगी ट्रॅव्हल्स बस मधील १० ते १२ प्रवासी जखमी झाले आहेत.त्यांना उपचारासाठी गोंदिया येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.यात दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे.या अपघाता बाबत पुढील तपास पोलिस करीत आहेत.

    Previous articleइर्टिगा कार व बोलेरा जीपची समोरासमोर भीषण धडक, अपघातात चार जणांचा मृत्यू
    Next articleमुसाळधार पाऊसाने अंबरनाथमध्ये मलंगगडावर दरड कोसळून एकाचा मृत्यू एक जखमी

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here