पुणे दिनांक १० जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबईला रविवार मुसाळधार पाऊसाने चांगलेच झोडपून काढले आहे.मुसाळधार पावसाने अनेक भागात पाणी साचले.व मुंबई महानगरपालिकेची पोलखोल झाली.महानगरपालिकेने नाले सफाई व ड्रनेजची कामे केली नसल्याने अनेकांच्या घरात व दुकानात पाणी शिरले व रोडला नाल्याचे स्वरुप प्राप्त झाले.त्यामुळे वाहन चालकांची चांगलीच फजिती झाली आहे.तसेच नागरिकांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे.या पाऊसाचा फटका लोककला देखील बसला आहे.तर अनेक ठिकाणी वाहन चालकांना ट्रॅफिकचा सामना करावा लागला आहे.दरम्यान आज देखील मुंबई व ठाण्यात मुसाळधार पाऊस कोसळणार आहे.
दरम्यान आज राज्यातील काही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.येत्या ३ ते ४ जोरदार पाऊसाची शक्यता निर्माण झाली आहे.यात प्रामुख्याने पुणे.मुंबई.ठाणे.पालघर.रायगड.रत्नागिरी.सिंधुदुर्ग. या भागात यलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे.तर कोल्हापूर.सातारा.सांगली.सोलापूर.अहमदनगर. नाशिक.जळगाव.छत्रपती संभाजीनगर.जालना.बीड परभणी.धाराशिव.नांदेड.या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.तर या पावसाने शेतकरी वर्ग सुखावला असून खरीपाच्या पेरण्याची लगबग सुरू झाली आहे.