पुणे दिनांक ११ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) काही दिवसांपूर्वी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बीड येथून शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचा साडेसहा हजार मतांनी पराभव करून जायन्ट किलर ठरले होते.ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अजित पवार यांच्या गटातून जेष्ठ नेते शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला होता.त्यानंतर शरद पवार यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना बीड लोकसभा येथून उमेदवारी दिली होती.
दरम्यान आता लोकसभा निवडणुकीचा व निकाल लागून एक आठवडा देखील झाला नाही.लगेच बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज फोन करून दहा मिनिटे चर्चा केली असल्याचा दावा अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी आज खळबळजनक दावा केला आहे.दरम्यान याबाबत अमोल मिटकरी यांनी त्यांच्या पोस्ट मध्ये म्हणाले आहे की.” बीडच्या बप्पाचा दादांना फोन ” आणि या बरोबरच # मोठ्यामनाचादादा असा हॅशटॅग वापरला आहे.दरम्यान यानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार अमोल मिटकरी म्हणाले की बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी अजित पवार यांना थेट फोन केल्याचे म्हटले आहे.दरम्यान यावेळी अमोल विटकरी हे पुढे बोलताना म्हणाले की.आगे आगे देखो होता क्या.येणा-या विधानसभा निवडणुकीपूर्वी तुम्हाला राज्याच्या राजकारणात वेगळे चित्र पाहायला मिळेल.असे ते यावेळी म्हणाले आहेत.