पुणे दिनांक ११ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार अंबरनाथ येथील मलंगगडावर आज मंगळवारी पहाटे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका युवकाचा मृत्यू झाला आहे.तर त्याची पत्नी गंभीररीत्या जखमी झाली आहे. तिच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव गुलाम बादशाह सैय्यद असे आहे.आपल्या लहान मुलाला वाचविताना त्यांचा मृत्यू झाला आहे तर पत्नी जखमी झाली आहे.
अंबरनाथ येथील मलंगगडावर सोमवार पासून मुसाळ धार पाऊस कोसळत आहे.रात्रीच्या सुमारास देखील मोठ्या प्रमाणावर मुसाळधार पाऊस कोसळत आहे. तर आज पहाटे सहाच्या सुमारास 🗻 डोंगरावरुन मोठं मोठे दगड कोसळायला सुरुवात झाली.या डोंगराच्या पायथ्याशी सैय्यद यांचे घर होते.दगड कोसळण्याचा आवाज येतात दोघे पती पत्नी यांनी एक वर्षांच्या मुलाला उचलून घेत असतानाच एक मोठा दगड त्यांच्या अंगावर आला यात लहान मुलाला कवटाळून धरले मुलाला वाचवताना दगड त्यांच्या अंगावर पडला यात ते जखमी झाले त्यांना तातडीने उपचारासाठी रूग्णांलयात दाखल केले असता गुलाम यांचा मृत्यू झाला आहे तर.त्याची पत्नी गंभीर रित्या जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर एक वर्षाचा मुलगा हा या घटनेत किरकोळ जखमी झाला आहे.