पुणे दिनांक ११ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे शहरातील वाहतूक शाखेचे पोलिस आता थेट आयुक्तांच्या रडारवर आता कारण नसताना नागरिकांकडून लाच किंवा चिरीमिरी घेताना सापडल्यास आता थेट पोलिस अधिकारी यांच्या वर कारवाई केली जाणार आहे.यांच्यावर देखरेख करण्या साठी खास सिव्हिल ड्रेस मध्ये काही कर्मचारी यांची नेमणूक देखील करण्यात आली आहे.लाच घेताना अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्या नंतर आता पोलिसांवरच वचक ठेवण्यासाठी पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी आता मोठे धोरण ठरविले आहे.
दरम्यान पुण्यात आता पोलिसांवर चांगला वचक आयुक्तांच्या या नवीन धोरणानुसार बसणार आहे. आता काहीच कारण नसताना पोलिसांनी नागरिक यांच्याकडून विनाकारण पैसे घेतले.तर आता 👮 पोलिसांवरच पुण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.वाहन चालकांची अडवणूक करून त्यांच्या कडून चिरीमिरी वसूल करणां-या वाहतूक पोलिसांना पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी थेट इशारा दिला आहे.यासाठी वाहतूक पोलिसांवर वाॅच ठेवण्यासाठी सिव्हिल ड्रेस वरील पोलिसांची नेमणूक देखील करण्यात आली आहे.दरम्यान वाहतूक पोलिस हे काही कारण नसताना वाहन चालकांकडून चिरीमिरी घेत असताना अनेक व्हिडिओ सोशल मीडिया वर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर या वाहतूक शाखेच्या पोलिसांवर वचक बसविण्यासाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी हा निर्णय घेतला आहे. आता सिव्हिल ड्रेस मध्ये असलेल्या पथकाला एखादा पोलिस कर्मचारी अढाळला तर त्याच्यावर आता कोणत्याही प्रकारची गयामया न करता थेट कारवाई करून खंडणीचाच गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.