Home फायर डोंबिवली फेज मधील इंडो-अमाईन्स केमिकल कंपनीला भीषण आग 🔥

डोंबिवली फेज मधील इंडो-अमाईन्स केमिकल कंपनीला भीषण आग 🔥

471
0

पुणे दिनांक १२ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार आज बुधवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास मुंबई येथील डोंबिवली येथील एम‌आयडीसीतील फेज दोन  इंडो-अमाईन्स केमिकल कंपनीला भीषण 🔥 आग लागली आहे.या ठिकाणी स्फोट मोठ्या प्रमाणावर होत आहे.या एमआयडीसीत सर्वत्र आगीचे काळे लोट पसरले आहे.आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

दरम्यान या केमिकल कंपनी जवळ अभिनव शाळा व रहिवासी भाग आहे.शाळेतील विद्यार्थी यांना आता शाळेतून सुट्टी दिली आहे.घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून रहिवासी यांना तातडीने स्थलांतरित केले जात आहे.या केमिकल कंपनीत आगीत किती कामगार अडकले आहेत.हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.या कंपनीला 🔥 आग लागल्यानंतर कंपनी मधील काही कामगार हे जीवाच्या आकांताने आग .आग ओरडत बाहेर पडले आहेत. अग्निशमन दलाचे जवान हे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.पण मध्येच स्फोट होत असल्याने आग विझविण्याचा कामात व्यतय येत आहे.

Previous articleशिक्षक -पदवीधर विधान परिषद निवडणुकीत महायुतीत धुसफूस? शिवसेना. राष्ट्रवादी व भाजपचे उमेदवार आमनेसामने
Next articleराज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांचे नाव निश्चित , बारामतीच्या दोन महिला खासदार संसदेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here