Home Breaking News राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांचे नाव निश्चित , बारामतीच्या दोन महिला खासदार संसदेत

राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांचे नाव निश्चित , बारामतीच्या दोन महिला खासदार संसदेत

680
0

पुणे दिनांक १२ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यानंतर राज्यसभेची  जागा रिक्त झाली होती.त्या जागी आता सुनेत्रा पवार यांची वर्णी लागणार आहे.उद्या राज्यसभेच्या जागेसाठी फाॅर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे.दरम्यान पुणे व बारामती येथील अनेक कार्यकर्ते यांनी पटेल यांच्या रिक्त झालेल्या जागेवर सुनेत्रा पवार यांची वर्णी लावावी याकरीता अजित पवार व  राष्ट्रवादी पक्ष नेतृत्वाकडे मागणी केली होती.या जागेवर पार्थ पवार व छगन भुजबळ.हे दोघेजण इच्छूक होते.पण या रिक्त जागेवर सुनेत्रा पवार यांचे नाव निश्चित झाले आहे. थोड्याच वेळात त्यांच्या नावावर पक्षाच्या वतीने घोषणा होऊ शकते.दरम्यान सुनेत्रा पवार यांची वर्णी या राज्यसभेवर झाल्यानंतर बारामती येथील दोन खासदार हे संसदेत असतील.व दोन्ही खासदार या महिला खासदार असतील.

Previous articleडोंबिवली फेज मधील इंडो-अमाईन्स केमिकल कंपनीला भीषण आग 🔥
Next articleसुनेत्रा पवारांना राज्यसभेची उमेदवारी राष्ट्रवादी पक्षाकडून जाहीर?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here